100 फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक किल्ले राजकोट येथे उभारले जाईल !

 

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत मागणी करणार 

सर्व तांत्रिक बाजू तपासून लवकरच निर्णय होईल : कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची किल्ले राजकोट येथे माहिती 

 

 

मालवण | प्रतिनिधी : किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. याची चौकशी होणार. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे 100 फूट उंचीचे भव्य स्मारक याठिकाणी व्हावे ही आमची मागणी असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे याबाबत मागणी केली जाणार आहे. महाराजांचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे. अशी भावना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी किल्ले राजकोट येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

 

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, बांधकाम विभाग वरिष्ठ अधिकारी अजित पाटील, प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गांवकर, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, सोनाली पाटकर, हर्षद पारकर यांसह अन्य उपस्थित होते.