लवेल नजीक कारची दोघांना धडक

 

खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील लवेल येथील समाधान ढाब्याजवळ अज्ञात वाहनचालकाने रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना धडक दिली. याअपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद तोहीब नूरमोहम्मद शेख (रा. लवेल) हे लहान भाऊ तन्वीर शेख याच्यासमवेत नजीकच्या पानपट्टीत जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. याचदरम्यान दुभाजकावर भरधाव वेगाने भ येणाऱ्या एम.एच.४३/ ए.डब्ल्यू. २०४२ क्रमांकाच्या हे कारने धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता चिपळूणच्या दिशेने पलायन केले. पोलिसांकडून फरारी चालकाचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.