शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात आज नृत्याविष्काराचा थरार

 

खेड(प्रतिनिधी) दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या. मार्गदर्शनाखाली २७ ऑगस्ट रोजी
तीनबत्तीनाका-हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथे दहीहंडी उत्सव दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. शहर शिवसेनेच्या वतीने यंदाही १ लाख ११ हजार १११ रूपयांची मानाची हंडी उभारण्यात
येणार असल्याची माहिती शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी दिली.

या उत्सवादरम्यान प्राची जाधव, तेजस शिंदे यांचा नृत्याविष्काराचा थरारही पहावयास मिळणार आहे.
शिवसेना व युवासेनेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या दहीहंडीत महिला गोविंदा पथकांनाही हंडीफोडण्याची संधी देण्यात येणार असून रोख पारितोषिके व सन्मानचिन्हं देवून गौरवण्यात येणार आहे.

दहीहंडीस सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी मोफत लकी ड्रॉ हा कार्यक्रमही होईल. महिलांसाठी पैठणी व लहान मुलांसाठी सायकल देवून विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपशहरप्रमुख स्वप्निल सैतवडेकर,
सचिव पराग चिखले, माजी नगरसेवक संजय मोदी, मिनार चिखले, राजेश बुटाला, सतिशचिकणे, युवासेना शहर अधिकारी सिद्धेश खेडेकर, महिला शहर संघटिका माधवी बुटाला, युवती सेनेच्या अॅड. पुनम जाधव, परेश चिखले, प्रेमल चिखले, दीपक नलावडे यांच्यासह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.