तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यामंदिर व कै. एकनाथ राणे हायस्कूलचे सुयश

 

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका शालेय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यामंदिर व कै. एकनाथ राणे इंग्लिश मिडीयम स्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे.
लांजा तालुका शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा ज्ञानेश्वर विद्यामंदिर शाळेत नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत ,लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, संस्थेचे खजिनदार जयवंत शेट्ये, मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा राणे , संचालक कौस्तुभ राणे, लांजा तालुका तायक्वांदो संघटना अध्यक्ष किशोर यादव व सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते .

 

 

या स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्या मंदिर व कै. एकनाथ राणे हायस्कूल लांजा प्रशालेने तब्बल ३५ पदके मिळवली. त्यामध्ये १४ गोल्ड मेडल, १४ सिल्वर मेडल व सात ब्रॉंझ मेडलचा समावेश आहे. १४ मुलांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यामध्ये १४ वर्षाखालील गटात तेजस्वी लाड, गुडिया कुमारी शहा, कौस्तुभ कदम, तनिष लांजेकर ,अर्णव गुरव, दक्षण यादव ,विराज जाधव, सोहम सुर्वे तर १७ वर्षाखालील गटात श्रेया कांबळे, पायल जोशी, अशरीन नाईक ,सुमित्रा राठोड ,अहमदरज्जा मापारी, महमंद जैद मुकरी , या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना तायक्वांदो कोच तेजस्विनी आचरेकर, तेजस पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा राणे, सौ प्रिया भागवत, क्रीडा शिक्षक सुशील वासुरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे