लांजा (प्रतिनिधी) कुणबी सेवा संघ लांजा व दापोली आणि आश्विनी ऍग्रो फार्म दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पळझाड वाटप कार्यक्रम नुकताच ग्रुप ग्रामपंचायत बेनीखुर्द खेरवसे येथे पार पडला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेनीखुर्द खेरवसे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री लाखण यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर सरपंच श्रीमती मोनिका चव्हाण, उपसरपंच विजय बंडबे व ग्रामपंचायत सदस्य,
कुणबी सेवा संघ लांजाचे अध्यक्ष शांताराम गाडे, कुणबी सेवा संघ दापोली अध्यक्ष प्रभाकर शिंदे, कुणबी सेवा संघाचे सचिव अशोक कातकर, खजिनदार श्रीमती. स्मिता मांडवकर, सहसचिव विलास दरडे ,सदस्य शिवप्रकाश चौगुले, सिताराम पालकर, सुरेश गावडे, प्रकाश जोशी तसेच कुणबी सेवा संघ दापोलीचे सचिव हरिश्चंद्र कोकमकर, कुलकर्णी काळे छात्रालयाचे अधिक्षक अजय नेमण, व ग्रामस्थ यशवंत निवदेकर उपस्थित होते .
प्रास्ताविक स्मिता मांडवकर यांनी केले. यामध्ये त्यांनी कुणबी सेवा संघ लांजा व दापोली संस्थेची ओळख करून दिली. संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर दापोली संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मोफत वाटप करण्यात येणाऱ्या फळझाडा बद्दल माहिती दिली त्यामध्ये कोकम व काळीमिरी बद्दल माहिती देऊन त्या पासून मिळणारे उत्पन्न किती प्रमाणात असते याची माहिती दिली. कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष शांताराम गाडे यांनी संस्थेची माहिती देतानाच कुलकर्णी काळे छात्रालय येथे मुलांना प्रवेश घेण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांना झाडांविषयी माहिती दिली.
त्यानंतर सिताराम पालकर यांनी मान्यवर ,शेतकरी वर्गाचे आभार मानले. या कार्यक्रमाला शंभरहून अधिक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











