बहिरवलीत बिबट्याच्या संचारामुळे भीती

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली ग्रामस्थांची भेट, खबरदारीच्या सूचना
 खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील बहिरवली नं.१ येथे मानवी वस्तीत बिबट्याच्या वावर असल्याच्या शक्यतेने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील वनविभागाचे वनपाल सुरेश उपरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रानबा बबर्गेकर यांनी प्रत्यक्ष गावात जावून पोलीस पाटील व ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांनी सतर्क राहून खबरदारीच्या सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत.
परिसरात बिबट्या काही ग्रामस्थांच्या   दृष्टीस पडला होता. मानवी वस्तीत वास्तव्य असून भक्षाचा शोधात येत बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.त्या मूळे भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. या  बिबट्यापासून कोणालाही उपद्रव नसला तरी
पुरेपूर खबरदारी घेण्याबाबत पोलीस पाटील यांना लेखी पत्र सादर करत सूचना करण्यात आल्या आहेत