खेड(प्रतिनिधी) सीएसएमटी मुंबई येथे फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे तेजससह जनशताब्दी एक्सप्रेस २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
या कामामुळे मंगळूर-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस २८ फेब्रुवारीपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत धावेल. मडगाव- सीएसएमटी मुंबई तेजस एक्सप्रेसचा प्रवास २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकात संपुष्टात येईल. मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.










