खेड (प्रतिनिधी) एलपी इंग्लिश स्कूलमध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आहे. एल.पी. इंग्लिश स्कूलच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने व कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाच न राहिल्याने संस्थेची कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांनी ५ ताब्यात घेतली आहे.
माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भरतीला तात्पुरती स्थगिती दिल्याचे लेखीपत्र शिक्षण संस्थेला दिले आहे.
प्राथमिक दोन व माध्यमिक तीन अशा ५ जागांसाठी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेत संभाव्य उमेदवार मुलाखतीला येवून. त्यांचे नुकसान होवू नये, तसेच संस्थेचे नाव बदनाम होऊ नये, याकरिता शिक्षक भरतीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी संतोष. पाटणे, प्रदीप पाटणे, भालचंद्र पाटणे, बाळा खेडेकर आदी उपस्थित होते.











