भाजपा महिला शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर कडाडल्या
मालवण : महाराजांच्या नावाचे भांडवल करून राजकोट येथे उबाठाने रचलेला कट होता.
लाज वाटली पाहिजे ह्याना. अरे निषेध मोर्चाच्या नावा खाली हा उबाठाचा पेंग्विन आदित्य ठाकरे मालवण मध्ये येवून शिवाजी महाराजांच्या पावन झालेल्या भूमित पक्षीय राजकारण करून गेला. यांचे कार्यकर्ते स्वतःला शिवप्रेमी म्हणतात. अरे महाराजांना तरी सोडा. हातात उबाठाचे झेंडे घेऊन येथे येऊन तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचे होते. यायचेच होते तर शिवाजी महाराजांचे झेंडे का नाही आणलात. महाराजांचा पुतळा पडला. त्याचे राजकारण केले जातंय, आपली पोळी भाजली जातेय. मोर्चा महाराजांची प्रतिमा पुन्हा त्या तटावर एकजुटीने उभा करण्यासाठी गरजेचा होता. परंतु उबाठाने जे काही लज्जास्पद कृत्य केले त्यांना महाराजांच्या पायाशीही जागा मिळणे अशक्य आहे. अरे एका बाजूने महाराजांचा पुतळा उभा व्हावा म्हणून मोर्चा काढता आणि मारामारी करण्यासाठी त्यांच्याच तटाचे दगड काढून दगडफेक करता. राणे साहेबांच्या एका शब्दावर आम्ही ह्या पेंग्विनला जावू दिले. नाहीतर आमच्या साहेबांवर डोळे वर करून पाहणार्या पेंग्विनांना आम्ही आत डांबून ठेवून महाराजांचा पुतळा उभारे पर्यंत आत ह्यांची थडगी उभी केली असती. राणे साहेबांच्या मूठभर कार्यकर्त्यांनी उबाठा आणि त्यांच्या मित्रपक्षांना कामाला लावले. लक्षात ठेवा आमच्या साहेबांकडे मान वर करून पाहण्याची हिम्मत करू नका. नाहीतर काय होईल याचे जिवंत उदाहरण आज पहिलेच असेल. असा सूचक इशारा भाजपा शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर यांनी दिला आहे.











