रत्नागिरी l प्रतिनीधी:गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गुरुवारी रात्री रत्नागिरीत दाखल होत असून शुक्रवारी पावस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे रत्नागिरीत रात्री 09:30 वा. माऊली माहेर पावस येथे आगमन होणार आहे. शुक्रवार दि. 30-08-2024 सकाळी 05:30 वाजता पावस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर येथे पुजेला उपस्थिती राहणार आहेत. सकाळी 07:00 वाजता जयंत देसाई यांच्या निवासस्थानी (अनंत निवास) येथे भेट देणार आहेत. सकाळी 08:00 वाजता स्वामी समाधी मंदिर दर्शन, सकाळी 09:30 वाजता ‘समाधी मणीर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर सकाळी 11:45 वाजता समाधी मंदिर येथे सत्कार कार्यक्रम, दुपारी 12:00 वाजता समाधी मंदिर येथे स्वामी भक्तांशी संवाद साधणार आहेत तर दुपार 12:30 वाजता समाधी मंदिरात होणाऱ्या महाप्रसादाचा ते उपस्थित राहणार आहेत.












