शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये शुभम दिवेकर ठरला ‘मनसे श्री’

 

 

खेड(प्रतिनिधी) खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजवैभव प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत शुभम दिवेकरने मनसे श्री’चा किताब पटकावला. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्याहस्ते ५१ हजाराचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्हे देवून गौरवण्यात आले.

या स्पर्धेत सुयोग पदमुले ‘मनसे’ युवा’चा मानकरी ठरला. परीक्षक म्हणून किशोर म्हापदी, इरफान काद्री, आकाश पाटील (चिपळूण), महेश वादक, राज कारेकर, सुरज पाटणे, सिद्धेश पाटणे (खेड) यांनी काम पाहिले. याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष नीलेश बामणे, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, मिलिंद नांदगावकर, प्रसाद पाटणे, केतन आंब्रे, संतोष आखाडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.