खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील भरणे येथील ओम साई मित्र मंडळ व वनदे मातरम् संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भरणे येथील मेहता पेट्रोलपंप येथे लावण्यात आलेली पुस्तक दहीहंडी श्री देवी काळकाई गोविंदा पथक भरणे यांनी फोडली. पुस्तक दहीहंडी फोडल्यानंतर पुस्तके गोविंदांसह प्रेक्षकांना वितरीत करण्यात आली.
अमित कदम व राजेश मोरे यांनी स्थापन केलेल्या ओम साई मित्र मंडळ हे गेली २१ वर्ष भरणे येथे भरत फागे यांच्या सहकार्याने दहीहंडी उत्सव साजरा करत आहेत. अध्यक्ष विराज मोरे, सेक्रेटरी मोहम्मद सामी, खजिनदार सुयोग पांचाळ यांच्यासह कार्यकारिणी सदस्य यांनी अनोखी दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
संघटनेचे स्वप्निल बैकर यांनी दहीहंडी साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला. वंदे मातरम् संघटना आणि ओम साई मित्र मंडळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक व शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.










