खेड (प्रतिनिधी) खेड तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २ सप्टेंबर रोजी दुपारी
३ वा. पतसंस्थाध्यक्ष वैष्णवी हेळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणे येथील पतसंस्था कार्यालयात होणार आहे.
सभेत गतवर्षीच्या सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे, आर्थिक पत्रके वाचून कायम करणे, संचालक मंडळाने सूचवलेली नफा विभागणी मंजूर करणे, शासकीय लेखापरिक्षण अहवाल दोष-दुरूस्तीसह वाचन, शासकीय लेखापरिक्षकाची नेमणूक, २५ टक्के पुरूष सभासद करणेकामी उपविधी दुरूस्ती मंजूर करणे, अधिकृत भागभांडवल मर्यादा वाढवणे आदी विषयांवर चर्चा होणा आहे. सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावणी आंबेडे यांनी केले आहे.











