शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आवारामधील कौशल्य विकास केंद्र रत्नागिरी येथे दिनाक २८ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवशीय किचन कार्यशाळा संपन्न झाले.
यामध्ये जवळपास २० ते २५विद्यार्थी/विद्यार्थिनी नी सहभाग घेतला होता.
या वर्कशॉप मधे किचन मधील इंडियन, चायनीज, बेकरी इत्यादी खाद्य पदार्थ , त्यांची कुकिंग स्टाइल , कुकिंग टेक्निक्स, प्रेजेंटेशन इत्यादी शिकवण्यात आले.
सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना या कार्यशाळेचा छान अनुभव घेतला आणि नक्कीच या कार्यशाळेचा उपयोग त्त्यांना त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये फायदेशीर होईल व करियर साठी होईल असे मत सहभागिनी व्यक्त केले.
या कार्यशाळेसाठी कौशल्य विकास केंद्राचे श्री. अजित ढासडे सर , प्रमुख श्री. सूरज जाधव सर यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच कौशल्य विकास केंद्राचे कॉमिस शेफ ट्रेड चे श्री गणेश नांदवीकर व श्री ऋत्वेज शिधनकर सर तसेच समन्वयक श्री अमेय मुळ्ये सर व सौ अमृता साळवी मॅडम आणि इतर सर्व स्टाफ चे सहकार्य लाभले.












