गुहागर l प्रतिनिधी :जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज यांच्यावतीने गुहागर – विजापूर मार्गावरील गुहागर चिपळूण या 42 किलोमीटर अंतरासाठी मोफत ॲम्बुलन्स सेवा आजपासून उपलब्ध करण्यात आली आहे.
या ॲम्बुलन्सचा सर्व खर्च नरेंद्र महाराज संस्थान नाणीज यांच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यामध्ये ड्रायव्हरचा पगार ,गाडीचा मेंटेनन्स व गाडीचा डिझेल हा सर्व खर्च संस्थानाच्या वतीने करण्यात येणार आहे. अशाच प्रकारच्या एकूण 53 ॲम्बुलन्स संस्थानाच्या वतीने देशातील विविध महामार्गांवरती मोफत सेवा देत आहेत.
सदर ॲम्बुलन्स लोकार्पण हे गुहागर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जहांगीर यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर नीला नातू व गुहागर तालुक्यातील सर्व वैद्यकीय कर्मचारी व नरेंद्र महाराज संस्थानाचे सर्व पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते . ही ॲम्बुलन्स गुहागर – चिपळूण मार्गावरील देवघर येथील पेट्रोल पंपावर उपलब्ध असणार आहे.










