कोसुंब हायस्कूलमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 

देवरूख (प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील श्री शिवाजी शिक्षण उत्तेजक मंडळ संचलित श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

रविवारी सकाळी ठीक नऊ वाजता शाळेच्या प्रांगणातून स्पर्धेला सुरुवात झाली. सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. खालील विद्यार्थी या स्पर्धेत यश पात्र ठरले. लहान गट मुले- १) देवेंद्र सुभाष लिंबूकर १) श्रेयश मंगेश भोपळकर ३) तनिष सुरेश दळवी ४) दुर्गेश लव कोलापटे ५) प्रयान संतोष पानगले. लहान गट मुली-१) पायल अजित खाके २) आदिती वैभव जाधव ३) सोनाक्षी दिनेश धामणे ४) आरोही सुभाष धामणे ५) देवयानी लव कोलापटे मोठा गट मुले-१) मनीष मंगेश कुळे २) पराग सुभाष लिंबुकर ३) वेदांत मंगेश पातेरे ४) तन्मय विजय धामणे ५) आदित्य राजेंद्र पातेरे. मोठा गट मुली- १) सुविधा संतोष पानगले २) मनस्वी महेश धामणे ३) नियती दिनेश धामणे ४) अनुष्का उत्तम परीट ५) श्रावणी सुशांत जाधव. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव जाधव, सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.