रत्नागिरी : सन 2023 रोजी भारताकडे असलेल्या G20 अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात देशभरात विविध प्रकारच्या बैठका प्रशिक्षणे चर्चासत्रे कार्यक्रम आयोजित केले होते .भारत सरकारने एसएनडीटी महिला विद्यापीठाला शैक्षणिक भागीदार म्हणून w 20 चे आयोजन करण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने SNDT विद्यापीठाने काही निवडक महाविद्यालयांना w 20 आयोजनाचे आव्हान केले होते , महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शिरगाव येथील SNDT विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेज ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन फॉर वुमेन ,या महाविद्यालयाला w 20 च्या आयोजनाची संधी मिळाली होती . “वूमन लीड डेव्हलपमेंट” या अंतर्गत “ग्रासरूट वुमन लीडरशिप” या विषयाची निवड केली होती . या मध्ये बीसीए कॉलेजने रत्नागिरीतील विविध बचत गटांच्या समस्या व सूचना SNDT विद्यापीठापर्यंत पोहोचवल्या होत्या .तालुक्यातील बचत गटांच्या सर्व दहा क्लस्टर कॉर्डिनेटर्स यांचे “तळागाळातील महिलांचे नेतृत्व ” या विषयावर चर्चासत्र तसेच “डिजिटल मार्केटिंग” , यासंदर्भात कार्यशाळा व दहा क्लस्टरचे बचत गट स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी मांडले गेले होते . सदर परिषद दिनांक 15 जुलै 2023 रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शिरगाव येथील पवार सभागृह येथे पार पडली.
या W20 कार्यक्रमानिमित्त जमलेला बचत गटांच्या महिलांची व प्रभाग संघ प्रमुखांची आढावा बैठक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे पुणे येथील पदाधिकारी यांच्यासोबत दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी पार पडली.
या बैठकीची सुरुवात बचत गटा अंतर्गत काम करणाऱ्या महिलांची ओळख आणि त्या सध्या करत असलेल्या व्यवसायाबद्दल माहिती घेऊन झाली. या आढावा बैठकीमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या, पदाधिकाऱ्यांनी महिलांना त्यांचा व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी विषयी चर्चा करून संस्था म्हणून काय करता येईल याविषयी चर्चा केली. या बैठकीसाठी सर्व बचत गटातील महिलांनी उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या बैठकीमध्ये महिलांनी आपल्या व्यवसायासाठी अपेक्षित असलेल्या प्रशिक्षणा विषयी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली यांमध्ये विविध फळांपासून बनणारे पदार्थ तसेच त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया पद्धतीच्या प्रशिक्षणाची मागणी केली तसेच फोर व्हीलर ,रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण, मंदिरामधून निर्माण होणाऱ्या निर्मल्या पासून व अगरबत्तीच्या उदी पासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण, महिलांचे मनोबल व आत्मविश्वास वाढवण्यासाठी व्याख्याने यांची मागणी केली. यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि सर्व बचत गटातील महिलांना पुणे येथील संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. बचत गटातील महिलांनी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे नमूद केले व संस्थेने अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे संस्थेचे आभार मानले.
बैठकीसाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री .रवींद्र देव , उपकार्याध्यक्षा श्रीमती. विद्याताई कुलकर्णी ,सचिव डॉ. पी व्ही एस शास्त्री , संस्थेच्या डेव्हलपमेंट सेलच्या प्रमुख डॉ. मंजुश्री हुंडेकर , रत्नागिरी येथील प्रकल्प प्रमुख श्री मंदार सावंतदेसाई ,प्रकल्प समन्वयक श्री .स्वप्निल सावंत, प्रकल्प सदस्य श्री प्रसन्न दामले, सीए आनंद पंडित, बीसीए कॉलेज च्या प्र.प्राचार्य स्नेहा कोतवडेकर ,इतर कर्मचारी व विविध बचत गटांतर्गत कार्यरत असणाऱ्या महिला उपस्थित होत्या.












