चाफवली तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची सहाव्या वर्षी बिनविरोध निवड

 

देवरूख (प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची सहाव्या वर्षीही बिनविरोध निवड झाली आहे.

चाफवली गावातील जनतेने गेली पाच वर्ष प्रकाश चाळके यांना तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिले होते तसेच याही वर्षी सहाव्या वेळी सुद्धा गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे. यावेळी गावच्या सरपंच आरोही रावण, उपसरपंच विजय घुमे, माजी उपसरपंच सुरेश चाळके, पोलीस पाटील विजय चाळके, ग्रामसेवक माईन, संजय चाळके, ग्रामपंचायत सदस्य सोलकर मॅडम, राजश्री चाळके, नितीन बाईंग, ग्रामपंचायत सदस्य विनय चाळके, विनय रावण, विजय धुमक, राजाराम लिगम, संतोष गावडे हे उपस्थित होते सर्वांनी एकमुखाने तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची निवड केली.

कोरोना काळापासून प्रकाश चाळके यांनी गावात चांगले काम केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले. यापुढेही आपण चांगले काम करू सर्वाना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, तसेच गेली पाच वर्ष चाफवली ग्रामस्थांनी, तंटामुक्ती सदस्य, पोलिस पाटिल, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास व केलेले सहकार्य त्यामुळेच आपण चांगले काम करू शकलो. यापुढेही ग्रामस्थांना योग्य न्याय देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू, असे प्रकाश चाळके यांनी सत्कारप्रसंगी म्हटले.