डेगवे भजन स्पर्धेत वेंगुर्लेचे चिंतामणी मंडळ प्रथम

 

श्री स्थापेश्वर भजन सेवा संघाचे आयोजन

बांदा | प्रवीण परब : डेगवे येथील श्री स्थापेश्वर मंदिरात संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत वेंगुर्लेच्या चिंतामणी प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. साटम महाराज भजन मंडळ निरवडे द्वितीय तर इन्सुलीच्या श्री देवी माऊली भजन संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्रावण मासाचे औचित्य साधून श्री स्थापेश्वर भजन सेवा संघाच्या वर्षपूर्ती निमित्त स्थापेश्वर मंदिरात निमंत्रितांच्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ भजनीबुवा भालचंद्र केळुसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ६ दिग्गज संघानी सहभाग घेतला होता.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला, द्वितीय श्री साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ निरवडे, तृतीय श्री माऊली भजन सेवा संघ इन्सुली, उत्तेजनार्थ प्रथम रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुडाळ, द्वितीय श्री देव समाधी पुरुष भजन मंडळ मळगाव, तृतीय श्री देवी कालिका भजन मंडळ कारिवडे.

उत्कृष्ट गायक – अनिकेत भगत (वेंगुर्ले), पखवाज वादक – राहुल पांगम (वेंगुर्ले), झांज – साटम महाराज निरवडे, कोरस – श्री देवी कालिका भजन मंडळ कारीवडे, तबला – अनिकेत नाईक (कुडाळ), हार्मोनियम – साटम महाराज निरवडे, गौळण – चिंतामणी वेंगुर्ले, उत्कृष्ट स्थापेश्वर गजर – चिंतामणी वेंगुर्ले.

स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ भजनी बुवा भालचंद्र केळुसकर व गजानन देसाई यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाला डेगवे सरपंच राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, बांदा मंडल भाजपा सरचिटणीस मधुकर देसाई, सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, मधुकर देसाई, उमाजी देसाई, मधुकर आबा देसाई, सुभाष देसाई, मंगलदास देसाई, उत्तम देसाई, प्रेमानंद देसाई, सिताराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, भीमसेन देसाई, भगवान देसाई, रामा देसाई, तांबोळी माजी सरपंच अभिलाष देसाई, तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत, बांदा माजी सरपंच बाळा आकेरकर, आबाजी सावंत, तात्या स्वार, वीरेंद्र देसाई, वैभव देसाई, गजानन देसाई, नवनीत देसाई, संदीप देसाई, सूर्याजी देसाई, अरुण देसाई, बाबली देसाई, दादा देसाई, भरत देसाई, मनोज देसाई, विजय देसाई, साबाजी देसाई, भास्कर स्वार, स्वप्निल देसाई, सिताराम देसाई आदींसह डेगवे ग्रामस्थ व दशक्रोशीतील भजन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.