पोलीस निरीक्षक अमित यादव
*माखजन |वार्ताहर : कोणत्याही विद्यार्थ्याला पोलीस प्रशासनाची गरज वाटली तर पोलीस खाते तात्काळ मदत करेल,विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस खाते सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन संगमेश्वर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले.
ते संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल,अॅड पी.आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
प्रशालेत विद्यार्थी सुरक्षा,शालेय शिस्त,वाढती व्यसनाधीनता याविषयी संस्था,शाळा अशी पालक व विद्यार्थी यांची अशी संयुक्त सभा झाली यावेळी,विशेषतः पोलीस खात्याकडून मार्गदर्शन झाले.
श्री यादव यांनी महिलांसबंधी वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी सांगितले.विनयभंगासारखे काही प्रकार घडत असतील तर काय केले पाहिजे हेही विशद केले.अल्पवयीन मुलींसोबत कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास पॉक्सो कायद्याचीतरतूद असल्याचे सांगत,पॉक्सो कायद्याविषयी अधिक माहिती दिली.तसेच महिलांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार,आर्थिक अत्याचार याविषयी माहिती देत याविषयीच्या कायद्यातील तरतुदी सांगितल्या.
विद्यार्थांनी सायबर गुन्ह्यापासून दूर व्हायला पाहिजे,शिवाय मोबाईल च्या आधीन जाऊन गेम्स वैगरे खेळण्यात वेळ घालवू नका असा सल्ला दिला.शिवाय अल्पवयीन मुलांना गाड्या देऊ नका असे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी व्यसनाधीन होऊ नका ,जीवनाचा चांगला मार्ग निवडा असे नमूद केले.
माखजन पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांनी पालकानी सजग राहण्याची गरज असल्याचे नमूद केले.अल्पवयीन मुलांना गाड्या देऊ नये असे सांगत,याविषयीच्या कायद्यातील तरतुदी सांगितल्या.या सभेत मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी शालेय शिस्तीविषयी विद्यार्थी व पालक याना संबोधित केले.तर प्रशालेत ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस हवालदार किशोर जोयशी,पोलीस हवालदार श्री बरगले,संस्था अध्यक्ष डॉ दत्तात्रय बापट,सचिव दीपक पोंक्षे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,संचालक दीपक शिगवण,किशोर साठे,सुभाष सहस्त्रबुद्धे आदीसह पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांनी केले तर आभार संचालक किशोर साठे यांनी मानले.











