
चिपळूण : प्रतिनिधी l मुंबई – गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे सर्वश्रुत असतानाच आज सकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान चिपळूण बहाद्दूर शेख येथील उड्डाणपूल मोठा आवाज करीत खचला होता. सकाळी खालून वाहतूक तुरळक असल्यामुळे कोणतेही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही .मात्र हा पूल कधीही कोसळू शकतो अशा स्थिती होती. या ठिकाणी तातडीने पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. अतिशय धोकादायक अशी परिस्थिती चिपळूण बहादूर शेख उड्डाण पुलाच्या ठिकाणी निर्माण झाली असताना दुपारी हा ब्रिज कोसळला. आणि एकच गोंधळ उडाला. त्यात या कोसळलेल्या ब्रिजची पाहणी करण्यासाठी आमदार शेखर निकम गेले असतानाच उर्वरित ब्रिज कोसळला. यात आमदार शेखर निकमांना थोडीशी दुखापत झाले आहे. सोबतच शहर प्रमुख मिलिंद कापडी यांना देखील थोडी दुखापत झाले आहे ,विशेष काळजीची आवश्यकता नाही, मात्र हा विषय किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा दिसून आले हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे












