बांदा (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथील उपरकर शुटींग रेंजवर संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेत सातार्डा येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. १७ वर्षांखालील मुलगे पिस्टल प्रकारात ओंकार शेखर मेस्त्री याने द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुली ओपन साईट प्रकारात निधी हनुमंत गडेकर प्रथम व मृणाली दिलीप म्हालदार द्वितीय आली. १९ वर्षांखालील मुली पिस्टल प्रकारात आयुष्का आत्माराम गोवेकर प्रथम, मयुरी प्रवीण सातार्डेकर हीने द्वितीय क्रमांक मिळविला.
१९ वर्षांखालील मुलगे पिस्टल प्रकारात रामचंद्र हरेश पार्सेकर प्रथम, अथर्व रामचंद्र घाडी द्वितीय आला. १९ वर्षांखालील मुली ओपन साईट प्रकारात तनुजा शंकर पारिपत्ये प्रथम, मिताली विजेंद्र कांबळी द्वितीय आणि पालवी प्रदीप नाईक हीने तृतीय क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलगे ओपन साईट प्रकारात लक्ष्मण दत्ताराम सातार्डेकर याने द्वितीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभाग स्तरासाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई चे पदाधिकारी, शाळा समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक प्रशांत सावंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
————–










