असरोंडी गावातील बंद बीएसएनएल टॉवर अखेर कार्यान्वित

 

 

भाजपा बुथ कमिटी अध्यक्ष संजय सावंत यांनी मानले भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार 

मालवण | प्रतिनिधी : असरोंडी गावातील बीएसएनएल टॉवर गेले काही दिवस बंद होता. याबाबत संबंधित विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने असरोंडी गावातील भाजपा बुथ कमिटी अध्यक्ष संजय सावंत यांनी माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले. महेंद्र चव्हाण यांनी याबाबत थेट भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधत समस्या मांडली. दरम्यान याबाबत तात्काळ कार्यवाही होऊन बंद असलेला टॉवर अखेर कार्यान्वित झाला आहे. बंद बीएसएनएल टॉवर सुरु झाल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.