रेल्वे प्रवाशी युवतीवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी

 

कणकवली ( वार्ताहर )
कोकण रेल्वेची प्रवाशी युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी अरुण छोटुराम तेवतिया याला गुरुवारी येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
युवतीवर अत्याचार केल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली होती. घटनेनंतर पिडीतीला धमकी देऊन बेमालूमपणे तिथेच वावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली होती. न्यायालयाने आरोपीला सुरवातीला चार दिवसाची कोठडी दिली. तिची मुदत संपल्यावर न्यायालयाने बुधवारी एक दिवस पोलीस कोठडी वाढविली होती. त्या कोठडीची मुदत आज संपल्याने संशयित आरोपी अरुण छोटूराम तेवतीया याला पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले होते.