गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा
चिपळूण (वार्ताहर) : सामाजिक जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने यावर्षी रत्नागिरी जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा.
कोकण आणि गणपती उत्सव हे एक समीकरण आहे. भक्तीचा लोकरंग म्हणजेच गणेशोत्सव आहे. गणपती हे निसर्गाचेच रूप आहे. निसर्ग वाचला तर आपण अजून सुंदर जीवन बनवू शकतो . हे नाते अजून सुंदर बनवण्यासाठी
सामजिक जिव्हाळा फाऊंडेशन च्या वतीने पर्यावरण पूरक सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली अहे. या स्पर्धेत गणेश भक्तांनी सजावट केलेला भागाचे चित्रण करून पाठवायचे आहे. फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ असावा. दि. ७ सप्टेंबर रोजी व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील नंबरवरती सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या एक मिनिटाचे मखराचे व्हिडिओ पाठवा. ख
दिलीप नाचरे 8104022906, दिपक मादगे 8655247415, सचिन मटकर 7798163427, शैलेश धुमक 8169047520, आणि रविंद्र गांगरकर 8652002016 या नंबर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.










