खेड(प्रतिनिधी) तमाम गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आणि आशास्थान व आराध्य दैवत असलेल्या गणेशोत्सवाला . ७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर लाडक्या गणेशाचे स्वागत करण्यासाठी घराची रंगरंगोटी करणे, साफसफाई करणे, आरास तयार करणे आदी जय्यत तयारीला गणेशभक्त लागले आहेत. खेड शहरासह तालुक्यात १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि १०,९५६ घरगुती गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा ७ सप्टेंबर रोजी मंगलमय वातावरण मध्ये होणार आहे . त्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
शहरात व अन्य भागात शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, महाराष्ट्र, नवनिर्माण सेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, मुरली म नोहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, खेड बस स्थानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, महात्मा फ ले नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, संकल्प मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, कुंभारवाडा मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, टायटॅनिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड शिवतर रोड, लोटे परशुराम औद्योगिक वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यालय लोटे, लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अग्निशामक दल लोटे, घाणेखुंट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बेलदार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वेरळ, बेलदार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आठवडा बाजार भरणे, गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दस्तुरी शिवनेरीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, झोलाई. मित्र मंडळ, आंबवली आदी ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहेत.
लाडक्या गणेशाच्या आगमनाम मुळे शहरासह तालुक्यात आनंदाचे, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे. गणेशोत्सवाच्या .काळात लागणारे साहीत्य, गोड पदार्थ, फळ, मकर वा आरस करण्यासाठी लागणारे सजावटीचे साहित्य खरेदीसाठी दुकानही सजली आहेत.










