रत्नागिरी ः प्रतिनिधी :शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील भक्तीकुंज अपार्टमेंटमधील एका सदनिकेतून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत सोनल संतोष शितप (40,मुळ रा.निवेंडी सध्या रा.मिरजोळे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताने त्यांच्या सदनिकेतील रोख 14 हजार रुपये,सोन्याचे मंगळसूत्र,कानातले,चेन असा एकूण 1 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










