चौके येथील माजी सैनिक परशुराम गावडे यांचे निधन

चौके | प्रतिनिधी : चौके वावळ्याचे भरड येथील माजी सैनिक श्री. परशुराम काशीराम गावडे उर्फ तातू यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दुपारी राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्यात एक मुलगा,चार मुली,सून,जावई, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.

माजी सैनिक परशुराम गावडे हे चौके गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते.चौके ग्रामपंचायत माजी सदस्य होते. काही काळ विशेष कार्यकारी अधिकारी (जेपी) म्हणून कार्यरत होते.मालवण भारत गॅस चे कर्मचारी अनंत गावडे यांचे वडील होते.चौके येथील चिरेखाण व्यवसायिक बिजेंद्र गावडे, दत्ता गावडे तसेच प्रहारचे पत्रकार नितीन गावडे यांचें काका होते.

गुरुवारी सायंकाळी चौके येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चौके गावाच्या वतीने एकत्रित श्रद्धांजली वाहण्यात आली