रत्नागिरी l प्रतिनिधी :दापोली हर्णे जेटीबाग येथील समुद्रकिनारी बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगणार्या विरोधात दापोलि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6.15 वा. करण्यात आली.
गजानन गोविंद तीबित (रा.पाजपंढरी हणे,दापोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल दिलीप नवाले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,रविवारी सायंकाळी तो तेथील समुद्रकिनारी झाडाझुडपाच्या आडोशाला 500 रुपये किंमतीची 10 लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











