श्री गुरु सामाजिक, सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आला पुरस्कार
लांजा (प्रतिनिधी) महाराष्ट्रभर शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या श्री गुरु सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या लांजा शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दैनिक प्रहार चे लांजा प्रतिनिधी संतोष कोत्रे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या श्री गुरु सामाजिक व सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीने आयोजित विविध पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शहरातील कुलकर्णी काळे छात्रालय या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसंस्थेचे पदाधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर हिंदुराव लोंढे, (कोल्हापूर ) शाहीर गुलाबराव मुल्ला (सांगली), निवड समितीच्या अध्यक्ष शाहीर चित्रा पाटील (मुंबई )लांजा शाखेचे अध्यक्ष काशीराम जाधव ,गंगाराम हरमले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चांद खान तसेच मोहन घडशी शक्ती तुरा मंडळाचे लांजा शाखेचे अध्यक्ष श्री पालकर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
या कार्यक्रमात संस्थेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष शाहीर काशीराम जाधव यांच्या हस्ते दैनिक प्रहारचे लांजा प्रतिनिधी संतोष कोत्रे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी अन्य पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड संदीप ढवळ यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे लांजा राजापूर संगमेश्वर तालुक्यात शक्ती तुरा या जाखडी नृत्य कला जोपासणार्या कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजाच्या लांजाला राज्यस्तरीय आदर्श कोकण कलारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शिवाजी शिगम व्हेळ यांना जिल्हा शाहीर रत्न पुरस्कार, सलाउद्दीन चांदखान यांना राज्य कलारत्न पुरस्कार त्याचप्रमाणे विविध कलाक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा देखील यामध्ये सन्मान करण्यात आला यामध्ये विश्वनाथ हरमले ,संध्या वाडेकर, बळीराम दळवी ,मारुती मुकुटराव ,विद्या देवकर, महादेव पन्हळेकर ,कविराज जाधव ,मोहन गुरव, सूर्यकांत गोरुले, मधुकर अधटराव, ह भ प रामदास स नामे महाराज, सुभाष मोसमकर, वेदांत गोरुले यांचा देखील सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरमले गुरुजी यांनी तर सूत्रसंचालन काशीराम जाधव व कविराज जाधव यांनी केले.











