दापोली– दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळाआसूद नं.१चे उपक्रशील विषय शिक्षक महेश पांडुरंग गिम्हवणेकर यांना यावर्षीचा रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काने गौरविण्यात आले आहे.
आपल्या शाळेमध्ये नेहमीच नावीन्यपूर्ण उपकम राबवून शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणारे महेश गिम्हवणेकर हे सध्या जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा आसूद नं. १ येथे विषयशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, यापुवी ते ताडिलसुरा, कोंगळे या शाळांमध्ये कार्यरत होते. विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, ग्रामस्थांशी असलेला संपर्क यातून मिशन आपुलकी अंतर्गत देखील शैक्षणिक उठाव, अभिनयची आवड असल्याने विविध कार्यक्रमामध्ये सहभाग, साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांचे मासिक अंकातुन लेख, दैनिकांमधून लेख प्रसिद्ध झाले आहेत. खो- खो खेळाची आवड असून खो- खो खेळाचे जिल्हा पंच म्हणून काम पाहतात. विद्यार्थी हेच आपले दैवत असे नेहमीच मानणाऱ्या महेश गिम्हवणेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये डिजिटल एज्युकेशन, इ- लर्निंगसाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्यक्ष अनुभवातून व कृतियुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले श्री.गिम्हवणेकर सर यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंनाचा वर्षाव होत आहे.











