दापोली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

दापोली| प्रतिनिधी:- दापोली येथे आज जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील नव्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

या नव्या तालुका आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ८ आरोग्य केंद्र आणि ४६ उपकेंद्रांचे योग्य नियोजन राखून लसीकरण, इतर आरोग्य उपक्रम, आरोग्य विभागाच्या इतर सोयी-सुविधांच्या नियोजनाचे काम होणार असून हे आरोग्य अधिकारी कार्यालय ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा बनेल असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमित वंजारे, दापोली तहसीलदार अर्चना बोंबे, दापोली/खेड गटविकास अधिकारी गणेश मंडलिक,माजी सभापती किशोर देसाई, नगराध्यक्षा कृपा घाग, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, शहरप्रमुख प्रसाद रेळेकर, माजी पं. स.सभापती दीप्ती निखार्गे , चारुता कामतेकर, भगवान घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.