खेड (प्रतिनिधी) चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी मडगाव-पनवेल गणपती. स्पेशल धावणार असल्याचे रेल्वेप्रशासनाने जाहीर केले आहे.
त्यानुसार मडगाव-पनवेल गणपती स्पेशल १५ सप्टेंबर रोजी धावेल. मडगाव येथून सकाळी ९.३० वा. सुटणारी स्पेशल पनवेल येथे त्याचदिवशी रात्री १२.१५ वा. पोहचेल. परतीच्या प्रवासात १५ सप्टेंबर रोजी पनवेल येथून रात्री ११.४५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वा. मडगाव येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांच्या स्पेशलला राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वरसह अनेक स्थानकांत थांबे आहेत.










