रत्नागिरी :
राजापूरचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पासाहेब साळवी यांचे रात्री निधन झाले. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात त्यानी रत्नागिरीत झंझावात निर्माण केला होता. शिवसेनेचे रत्नागिरीतील ते पहिले जिल्हा प्रमुख होते. निधन समयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सून जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. सर्वसामान्यांसाठी त्यांनी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 4 वाजता त्यांचे थिबा पॅलेस रोड येथील निवासस्थानापासून निघणार आहे.









