महाराष्ट्रातील तरुणांनी केला सातासमुद्रापार गणेशोत्सव साजरा.

 

शंकर वैद्य l साखरपा : आपला कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गणपती बाप्पाचे वेड त्याला शांत बसूच देत नाही, असेच एक भक्तीचे आणि संस्कृतीचे उदाहरण आपल्या समोर आले आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गावातील तरुण पवन रविकांत वैद्य आणि त्याच्या सहकार्यांनी भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.

दरवर्षी गावी येऊन उत्साहात गणेशोत्सव साजरा करणारे हे तरुण मर्चंट नेव्ही स्कॉर्पिओ शीप मॅनेजमेंट या नामांकित कंपनी Southport या शीप मध्ये काम करत असलेले पण कामात असल्यामुळे त्यांना गावी येणे शक्य झाले नाही पण त्यांना बाप्पाची ओढ आणि आपली कोकणची परंपरा काही शांत बसू देत नव्हती, मग त्यांनी बोटीवरच जे काही जुने सामान होते त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घरच्यासारखे मकर तयार केले आणि बाप्पाची स्थापना केली, पूजा, आरती, भजन आणि प्रसादाचा अतिशय सुंदर घाट घातला. यामध्ये चीफ कूक किशन यांनी बाप्पाचे आवडते मोदक देखील बनवले.

या तरुणांचा हा आगळावेगळा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे,आपली महान संस्कृती जपणारा आहे. आपल्या मातीपासून कुटुंबापासून दूर असूनही अस एकत्र येऊन आपली संस्कृती जपत असे आपले सण समारंभ साजरे करून कॅप्टन प्रवीण श्रीवास्तव ,चीफ इंजिनियर दिगेश पटेल ,पंकज मंथ ,दिग्विजय राय,हितेश तांडेल,नीलकंठ तांडेल,भविष,उदय,प्रितेश,राजन,आणि इतर शीप कर्मचारी यांनी एक आदर्शच आपल्या समोर ठेवला आहे.