खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील कर्टेल गावातील बौध्दवाडीतील ३६ वर्षीय सनिकुमार गौतम येलवे याने घराजवळील गोठ्याजवळ आयनाच्या झाडाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना ०७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत.










