कशेडी घाटातील दोन्ही भुयारी मार्ग सुरु झाल्याने दिलासा
खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी येथील दुसरा भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे घाटमार्गे रस्त्यावरून जाण्याचे ४५ मिनिटांचे अंतर अवघ्या ८ मिनिटांत पार केले जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या वेळेची बचत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून दोन्ही भुयारी मार्गावर वाहतूक पोलिसांनी गस्त ठेवली असल्यामुळे वाहतूक कोंडी टळली आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पळस्पे, पनवेल तर पोलादपूरच्या कशेडी मार्गाला पर्यायी भुयारी मार्गापर्यंत महामार्ग पाहणी दौरा केला. त्यानंतर ३ सप्टेंबरपर्यंत दुसरा भुयारी मार्ग सुरू करण्याचे संकेत दिले. प्रत्यक्षात हरितालिकेच्या पूर्वसंध्येला
. ५ रोजी वाहतूक मार्गामुळे कशेडी घाटातील रस्त्यावरून सुरू झाली आहे. भुयारातील संरक्षक कठड्यांच्या स्टीलच्या जाळ्यांवर काँक्रिट ओतण्यात आले आहे. त्यावेळी भुयारावरील भागातील स्टीलच्या जाळ्यांवर सिमेंट काँक्रिटचे फोमिंगचे काम चालू होते, तर भुयाराच्या तोंडापाशी जमलेला डोंगरावरील लालमातीचा चिखल पोलेनने उकरून काढून रस्ता स्वच्छ केला जात होता. अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट ठेवलेले आहे.
भुयारी मार्गावर अपघात झाल्यानंतर दुसरा भुयारी मार्ग सुरू होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्वरित दुसरा भुयारी मार्ग तात्पुस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले. भुयारी
जाण्याचे ४५ मिनिटांचे अंतर अवघ्या आठ मिनिटात पार केले जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या वेळेची बचत होत आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून दोन्ही भुयारी मार्गांच्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कातळी भोगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी भागात दोन्ही बाजूंना आवश्यक ती यंत्रसामुग्री तैनात ठेवली आहे. तसेच कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राकडूनही बोगद्याच्या प्रवेशद्वाजवळील काही अंतरापासून तालुक्यातील खवटी व पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे पोलीस कर्मचारी गस्त घालत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी टळली आहे.










