गौस खतीब यांना दापोली खेड विधानसभा मतदार संघातून ऊमेदवारी द्यावी – अशोकराव जाधव

 
खेड(प्रतिनिधी) खेड विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे जुने जाणते जेष्ठ नेते  गौस भाई खतिब यांना दापोली -खेड  मतदार संघातून अल्पसंख्याक ऊमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे
 दापोली – खेड विधानसभा मतदार संघात ग्रामिण भागात  काँग्रेस कडून सर्व्हे केला जात आहे. सदर सर्व्ह करणारे लोक फक्त प्रेदश अध्यक्ष  नाना भाऊ पटोले यांनाच रिपोर्ट करणार आहेत  नाना पटोले कोकणात काँग्रेस संघटन मजबूत करणे साठी प्रयत्नशिल आहेत त्यामुळे सर्वानी एकत्रीत येवून एकसंघ पणे पक्षाच्या बैठका गाववार घ्याव्यात काँग्रेस पक्षाचे बीएलओ यांची नियुक्ता कराव्यात आणि दापोली -खेड विधानसभा मतदार संघातून अल्पसंख्याक उमेदवार म्हणून खेड तालुका अध्यक्ष गौस खतिब यांना उमेदवारी दिल्यास जेष्ठ कार्यकर्त्यांला न्याय दिल्या सारखे होईल
 या मूळे  काँग्रेस संघटना मजबूत होणेस सहकार्य मिळेल हा सर्व सारासार विचार करून  गौस खतिब यांना दापोली -खेड विधानसभा मतदार संघाची काँग्रेस मधुन ऊमेदवारी द्यावी अशी मागणी बहुसंख्य जिल्हातील जिल्हा पदाधिकारी करत आहेत असे ही अशोकराव जाधव यांनी सांगितले .