माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी मांडली रोखठोक भुमिका
मालवण | प्रतिनिधी : आरक्षण संपवणार… या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विधानाचा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते तथा माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
मालवण भाजपा कार्यालय येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अंकुश जाधव म्हणाले, राहुल गांधी अमेरिकेत म्हणाले, भारतातील आरक्षण संपवणार. त्यांचे हे विधान अनेकांच्या हृदयाला लागणारे आहे.
मागास समाजाला सामान पातळीवर आणण्यासाठी संविधान कर्त्यांनी आरक्षण तरतुदी केल्या. 1902 वर्षी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आरक्षण दिले.
असे असताना केवळ राजकारण आणि ढोंगी पणा आणणारे राहुल गांधी करत असलेले विधान निषेधपूर्ण आहे. भारतीय जनता पार्टी, आंबेडकर अनुयायी, आरक्षित समाज यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध. आरक्षण साठी अनेकजण रस्त्यावर येत आहेत. मराठा समाज, धनगर समाज आरक्षण साठी भांडतो आहे. त्यांनाही दुःख वाटेल असे विधान आहे. असेही जाधव म्हणाले.
संविधान तरतुदी कोणाला बदलता येणार नाहीत. गांधी घराण्यातील पंतप्रधान झाले ते बदलू शकले नाहीत. असे असताना राहुल गांधी सनसनाटी पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांचा ढोंगी चेहरा उघडा पडला आहे. भारताने त्यांचे खरे रूप पाहिले. असे सांगत अंकुश जाधव यांनी राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला.
*भाजपा जनतेच्या हितासाठी*
भारतीय जनता पार्टी नेहमीच जनतेच्या हितासाठी कार्यरत राहिली. आरक्षित जनतेचे कल्याण, बौद्ध हीत, लोकशाही हीत, आरक्षण हीत यासॊबत बहुजन, शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, विध्यार्थी यांना न्याय देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नेहमीच प्राधान्याने प्रयत्नाशील असल्याचे अंकुश जाधव म्हणाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न काँग्रेस सत्ता काळात देऊ शकले नाहीत. मात्र भाजपानेच त्यासाठी पुढाकार घेतल्याचे अंकुश जाधव यांनी स्पष्ट केले. एकूणच राहुल गांधी व काँग्रेस यांच्या कारभारावर सडकून टीका केली.











