करुळ गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संजय कदम यांची निवड

 

 

वैभववाडी l प्रतिनिधी :   करुळ गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संजय पांडुरंग कदम यांची निवड झाली आहे. पार पडलेल्या ग्रामसभेत त्यांची एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

मागील वर्षी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावर विश्वास उर्फ बबन सावंत यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. गावातील अनेक तंटे सामंजस्याने मिटवण्यात त्यांना यश आले आहे.

नुतन अध्यक्ष संजय कदम यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गावातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन तंटे व तक्रारींचे सामंजस्याने मिटवण्यात येतील असे यावेळी संजय कदम यांनी सांगितले.