खेडमध्ये ३ सार्वजनिक सह १० हजार ६३२ बाप्पाला निरोप 

 

 

खेड(प्रतिनिधी) ‘गणपती बाप्पा मोरया या, पुढच्या वर्षी लवकर या’ जयघोषासह खेड शहर आणि तालुक्यातील ग्रामीण

भागात ठिकठिकाणी १२ सप्टेंबर रोजी पाच दिवसाच्या गणपती बाप्पां सह आगमन झालेल्या गौरीला निरोप देण्यात आला. यामध्ये

शहरातील १० हजार ६३२ घरगुती गणराय सह ३ सार्वजनिक गणरायाला निरोप देण्यात आला

 

 

तालुक्यात दुपारी चार नंतर गणेशभक्तांनी सहकुटुंब

मिरवणुकीत सहभागी होऊन ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. विधिवत पूजा, आरती करून व

नैवेद्य दाखवून जगबुडी नदीच्या घाटावर विसर्जन केले गेले.

 

यामध्ये शहरातील दशानेमा सार्वजनिक , भरणे मधील जय गणेश मित्र मंडळ व कळ बणी येथील सार्वजनिक बाप्पाचा समावेश होता मंगळवारी सोन पावलाने आगमन झालेल्या गौरी ला देखील भक्ति भावाने निरोप देण्यात आला

 

निर्माल्य गोळा करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने कलशाची व्यवस्था केली आहे. सायंकाळी या ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीने विसर्जन करण्यात आले. दरम्यान, वरुणराजाने सकाळपासून उघडीप दिल्याने गणेशभक्तांचा उत्साह वाढला होता. रात्री उशीरा पर्यत विसर्जन सुरू होते