
रत्नागिरी | प्रतिनिधी : आपला लडका नेता आपल्या घरी यावा आणि आपल्या आनंदात सहभागी व्हावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. तीच इच्छा माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान पूर्ण केली.
खा. राणे हे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या समवेत सौ. नीलमताई राणे याही आहेत. सिंधुदुर्ग मधून रत्नागिरीत आल्यानंतर खा. राणे यांचे राजापूर, लांजा तसेच हातखंबा येथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील भाजपाचे कार्यकर्ते वैभव पवार यांनी दादांना त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट इच्छा व्यक्त केली. खा. राणे यानीही ती तात्काळ पूर्ण करत पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथे विराजमान झालेला गणपती बाप्पाचे तसेच सत्यनारायण महापूजेचे सपत्नीक दर्शन घेतले.












