खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील कोष्टेआळी येथील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू धंद्यावर येथील पोलिसानी अचानक धाड टाकून ३३०० रुपये किमतीची ३३ लिटर दारू जप्त केली ही कारवाई १३ सप्टेंबर रोजी करण्यात आली
या प्रकरणी विठ्ठल मंगेश चव्हाण ४५ याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
संशयीत हा कोष्टेआळी येथील मोकळ्या जागेत खेड गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशिररीत्या लोकांना चढ्या भावाने विक्री करणेसाठी आपले ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ मिळुन आला त्याच्या कडून ३३०० रू किंमतीची ३३ लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली











