खेड(प्रतिनिधी) गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी प्रशासनाने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार २७५ जादा बसफेऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावल्या
. गुरूवारपासूनच महाडनाका येथील गोळीबार मैदानात जादा बसेस मार्गस्थ होत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी गोळीबार मैदानात विशेष कक्षही स्थापन करण्यात आला आहे. मुंबई, बोरिवली, ठाणे, विठ्ठलवाडी, कल्याण, नालासोपारा, पुणे आदी मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या शुक्रवारीही सर्वाधिक जादा बसेस सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र येथील येथील बसस्थानकात काही चाकरमानी पायपीट करत तर काही प्रवासी रिक्षांद्वारे आर्थिक भुर्दंड सहन करत गोळीबार मैदानात पोहचावे लागले . १६ सप्टेंबरपर्यंत जादा बसफेऱ्या सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी जादा बसेस सोडण्याची तयारी एसटी प्रशासनाने केल्याचे समजते.











