खेड (प्रतिनिधी) शहरातील तीनबत्ती नाका येथील खांबळे समोर शिवसेना शहर शाखेतर्फे आयोजित खेडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव येथे लहान मुलांसाठी चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आ. योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेना आयोजित खेडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव खांब तळे येथे साजरा करण्यात येत आहे. या ठिकाणी शनिवारी लहान मुलांसाठी रंग भरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांनी गणरायाच्या समोर चित्रात रंग भरले. मुलांचा उत्साह दांडगा होता.
स्पर्धेत सहभागी मुलांना गणपती बाप्पाचा प्रसाद देण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, राजेश बुटाला, माधवी बुटाला व विविध शाळांतील शिक्षकांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.










