वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि वेंगुर्ले कुबलवाडा येथील रहिवासी प्रसन्ना उर्फ पपू कुबल (वय 55) यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले. कुबल यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. भाजप च्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा सौ. स्नेहा कुबल यांचे ते पती होत. माजी नगराध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांचे ते दिर होय.












