लांजा महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे शुक्रवारी उद्घाटन

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणाली द्वारे होणार उद्घाटन

लांजा (प्रतिनिधी) लांजा महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र मंजूर झाले असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य
प्रणालीद्वारे होणार आहे

 

 

लांजा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयास महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्यामार्फत हे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र मंजूर झाले आहे.शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे..