खेड(प्रतिनिधी) खेड शहर रोहिदास समाज सेवा संघाच्या अध्यक्षपदी सुधीर देवळेकर यांची निवड करण्यात आली. शहरातील श्री देवी रामवरदायिनी मंदिरात झालेल्या सभेत ५ वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
यामध्ये उपाध्यक्षपदी गोविंद खेडेकर, कार्याध्यक्ष-गणेश खेडेकर, सचिव-उमेश खेडेकर, सहसचिव- सचिन खेडेकर, खजिनदार – प्रथमेश गिम्हवणेकर, सल्लागार-चंद्रकांत देवळेकर, हिरामण खेडेकर, सदस्य-विशाल खेडेकर, राजेश खेडेकर, तर महिला सदस्या म्हणून रूपाली खेडेकर यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट कार्याबद्दल मागील कार्यकारिणीसह नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील अशोक देवळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर, माजी नगरसेवक बाळा खेडेकर, माजी नगरसेविका रूपाली खेडेकर, मावळते अध्यक्ष चंद्रकांत देवळेकर, राकेश खेडेकर, रवींद्र खेडेकर, अमोल खेडेकर, सचिन गो. खेडेकर, बाळकृष्ण खेडेकर, श्रीकांत देवळेकर, सुयश खेडेकर, सचिन मो. खेडेकर आदी उपस्थित होते.










