खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील सवणस खुर्द तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अब्दुल सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ते सामाजिक कार्यात अग्रस्थानी असून गावात सलोखा राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. यामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.









