खेड शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा, टँकरने पाणी पुरवठा

खेड(प्रतिनिधी) खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भरणे येथील जॅकवेलमधील तांत्रिक बिघाड महावितरणने दूर करत पाणीपुरवठा सुरळीत, झाला असला तरी बहुतांश भागात कमी दाबाच्या पाणीसमस्येचा फेरा कायम आहे. कमी दाबाच्या पाण्याची.. समस्या भेडसावणाऱ्या भागात नगरपरिषदेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहान भागवली  जात आहे.
शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीरबनत चालला. आहे. क्षेत्रपालनगर, शिवतररोड, ब्राह्मणआळी, कुवारसाई, दापोलीनाका, सोनारआळी, एकविरा नगर आदी परिसरात कमी दाबाच्या पाणी समस्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी भरणे येथील विद्युतरोहित्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला होता. नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान शमवावी लागली होती. पंपातील बिघाड दूर झाल्यानंतर विस्कळीत पाणीपुरवठा पूर्ववत झाला असला तरी कमी दाबाच्या पाण्याची समस्या कायम आहे. .
शहरातील अनेक भागात नगरपरिषदेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवण्याची वेळ ओढवली आहे शहरवासीयांना भेडसावणारी कमी दाबाच् पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी  प्रशासकीय पातळीवरून अजूनही कुठल्या उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने  याचा नागरिकांना फटका बसत आहे टँकरच्या पाण्यावर आणखी किती दिवस तहान भागवायची? असा प्रश्नही उपस्ि केला जात आहे.